कल्याण येथील मंदिरात चोरी करणारा धर्मांध अटकेत !
कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांध गुन्हे करण्याचे धाडस करतात !
ठाणे, २७ जुलै (वार्ता.) – कल्याण पश्चिम भागातील घोडेखोत आळी येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी करणार्या धर्मांध चोरट्याला भिवंडी येथून पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने २४ घंट्यांत सापळा रचून साकीब उपाख्य सलमान महंमद अख्तर अंसारी (वय २४ वर्षे) याला अटक केली आहे. कल्याण पश्चिम भागातील घोडेखोत आळी येथे असलेल्या श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात २४ जुलैच्या त्याने मध्यरात्री चोरी केली होती. चोरट्याने मंदिरातील चांदीची गदा, तसेच चांदीचा मुकुट, चांदीचा रुईच्या पानांचा हार, पितळी टोला, टाळ, दान पेटीतील रोकड यासह सीसीटीव्हीचा डी.व्ही.आर्. चोरला होता.