फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याने मागितली १० सहस्र रुपयांची लाच !
रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
रायगड, २७ जुलै (वार्ता.) – रोहा तालुक्यातील सजा भालगाव येथील तलाठी संतोष मनोहर चांदोरकर यांनी फेरफार नोंद संमत करून त्याचा उतारा देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १० सहस्र रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी तलाठी संतोष चांदोरकर यांच्याविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चांदोरकर यांनी लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आले. चांदोरकर यांनी १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारण्याची सिद्धता दर्शवल्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कह्यात घेण्यात आले. तलाठी चांदोरकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :लाच घेणार्या प्रशासकीय अधिकार्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! |