खडके (जिल्हा जळगाव) येथील शासकीय वसतीगृहातील अल्पवयीन ५ मुलींच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी ३ जणांना अटक !
विधान परिेषदेत पडसाद !
मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके गावातील मुलींच्या वसतीगृहातील ५ अल्पवयीन मुलींवर वसतीगृहातील काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी २७ जुलै या दिवशी विधान परिषदेत केली. याला उत्तर देतांना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, या प्रकरणातील ३ आरोपींना २६ जुलै या दिवशी अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांवर पोस्का, ॲट्रासिटीसह विविध कडक कलमे लावून कारवाई करण्यात येईल.
#CrimeNews : वसतीगृहाच्या काळजीवाहकाकडून 5 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, अधिक्षिका पत्नीनं लपवला प्रकार#Jalgaon #Hostelhttps://t.co/xilY5l9vy6
— ABP माझा (@abpmajhatv) July 27, 2023
एकनाथ खडसे म्हणाले की, आरोपी लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलींनी वेळोवेळी संस्थेचे अधीक्षक आणि सचिव यांना दिली असतांनाही त्यांनी ही माहिती लपवून ठेवली. विशेष गोष्ट म्हणून याविषयी चर्चा करावी.
https://t.co/99sbaTcT62
खडके, ता. एरंडोल, जि. जळगाव येथील वस्तीगृहात ऑगस्ट २०२२ ते आजपर्यंत दलित व आदिवासी समाजातील ५ अल्पवयीन मुलींवर रेक्टरच्या पतीने वारंवार बलात्कार केले. मुलींनी यासंबंधी तक्रार संस्थेचे अधिक्षक व सचिव यांचेकडे केली असता त्याची दखल घेतली गेली नाही. सदरची घटना…— Eknath Khadse (@EknathGKhadse) July 27, 2023
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पीडित ५ मुलींनी तक्रारी केल्या आहेत. आरोपी, त्यांची पत्नी आणि वसतीगृहाच्या अधीक्षक अरुणा पंडित आणि सचिव भिवाजी पाटील यांचाही यामध्ये सहभाग आहे.