हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेली अनुभूती

१. गावातील काही लोकांनी केलेला विरोध !

सौ. राजश्री तिवारी

‘कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील भुयेवाडी येेथील हिंदुत्‍वनिष्‍ठांनी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभे’चे आयोजन केले होते. या सभेच्‍या आयोजनासाठी त्‍यांनी प्रसार बैठका घेणे, घरोघरी प्रसार करणे, असे प्रयत्न केले. हे प्रयत्न करत असतांना गावामध्‍ये ‘हिंदु जनजागृती समिती’, ही ब्राह्मणांची संस्‍था आहे आणि ती तुमचे डोके बिघडवत आहे’, अशा प्रकारचा विरोध झाला. तेव्‍हा हिंदुत्‍वनिष्‍ठ मुलांनी एकत्रित येऊन त्‍यांना योग्‍य पद्धतीने उत्तर दिले.

२. हिंदुत्‍वनिष्‍ठांना त्रास देणारे पोलीस !

गावातील सभेसाठी पोलीस प्रशासनानेही हिंदुत्‍वनिष्‍ठांना त्रास दिला. पोलीस सभेच्‍या दिवशी सभा होईपर्यंत त्रास देत होते. प्रथम २ दिवस त्‍यांनी सभेला अनुमती दिली नाही. हिंदुत्‍वनिष्‍ठांंना पोलीस ठाण्‍यामध्‍ये पूर्ण एक दिवस बसवून ठेवले. नंतर सभेचे स्‍थळ पालटायला सांगितले. एवढे होऊनही हिंदुत्‍वनिष्‍ठांनी सभा घेतली. आता त्‍या गावामध्‍ये धर्मशिक्षण वर्ग चालू झाला आहे.

३. अनुभूती

३ अ. पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ उभी राहू शकत नसतांना सभेमध्‍ये ३० मिनिटे उभी राहून बोलल्‍यावर कोणताही त्रास न होणे : श्री गुरूंच्‍या कृपेने एका गावात ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा’ होती. त्‍या वेळी मी १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ उभी राहू शकत नव्‍हते, तरी मला सभेत विषय मांडायचा होता. तेव्‍हा मला ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर सभेच्‍या माध्‍यमातून समाज प्रबोधन करणार आहेत’, याची जाणीव झाली आणि माझ्‍याकडून हा विषय मांडला गेला. मी ३० मिनिटे उभी राहून बोललेे, तरीसुद्धा मला काहीही त्रास झाला नाही. मला सहसाधिकेने विचारले, ‘‘नेहमी तुम्‍हाला त्रास होतो, तसा या वेळी झाला नाही का ?’’

३ आ. मला पूर्ण सभेमध्‍ये केवळ गुरुदेवांचे अस्‍तित्‍व जाणवत होते.’

– सौ. राजश्री तिवारी, कोल्‍हापूर

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक