सद़्गुरु जाधवकाका, आपणांस कोटी कोटी नमस्कार ।
हे गुरुमाऊली, आपली केवढी ही प्रीती ।
आम्हा साधकांना येई नित्य प्रचीती ॥ धृ. ॥
तुजसम दिसती, चालती ।
तुजसम बोलती, तुजसम प्रीती करती ।
तव रूपाने ते आमच्यासाठी धावून येती ॥ १ ॥
त्यांच्या अस्तित्वाने ।
आणि संकल्पाने होते शंकांचे निरसन ।
गुरुदेवा, तुम्हीच आहात त्यांच्या रूपे ।
कित्येक साधकांना होते स्मरण ॥ २ ॥
गुरुदेवस्वरूप रहाती सदैव आमच्या मनी ।
सद़्गुरु नंदकुमार जाधवकाकांच्या पावन चरणी ।
आम्हा सर्व साधकांचा शिरसाष्टांग नमस्कार ।
अशीच कृपा आमच्यावर सदैव असावी, अशी आपल्या चरणी प्रार्थना ॥ ३ ॥
सद़्गुरु काका अपार कष्टाने घडवती साधकांना ।
आमचे प्रयत्न अल्प असूनही कौतुक करून प्रोत्साहन देती ।
स्वतः कष्ट घेऊन, अखंड भ्रमण करती ।
आम्हा साधकांच्या प्रेमापोटी ॥ ४ ॥
ज्यांच्या मनमोहक रूपाने, साधक आनंदात बुडून जाती ।
ज्यांच्या प्रेमळ शब्दाने साधकांची हृदये कृतज्ञतेने भरून येती ।
आम्हा सर्वांचा उद्धार होतसे तुमच्या कृपेने ।
आम्ही सर्व लेकरे करतो आपणांस कोटी कोटी नमस्कार ॥ ५ ॥
– श्री. हर्षद खानविलकर आणि सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), जळगाव (७.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |