केंद्रीय मंत्र्यांना अश्लील ‘व्हिडिओ कॉल’ करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारे २ धर्मांध अटकेत !
नवी देहली – केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना अश्लील ‘व्हिडिओ कॉल’ करून त्याद्वारे त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारे महंमद वकील आणि महंमद साहिब या दोघांना देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना सेक्सटोर्शन कॉलद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे.#PralhadPatel https://t.co/wdNKSpfw0M
— Saamana (@SaamanaOnline) July 26, 2023
७ जून या दिवशी प्रल्हाद पटेल यांना व्हॉट्स अॅपवर व्हिडिओ कॉल आला होता. तो त्यांनी स्वीकारल्यावर त्यावर अश्लील व्हिडिओ दिसू लागला. त्यामुळे त्यांनी तो कट केला. थोड्या वेळाने पुन्हा असाच कॉल आला आणि तेव्हाही अश्लील व्हिडिओ चालू झाला. या वेळी कॉल करणार्यांनी पटेल यांना धमकी दिली की, तुम्ही अश्लील व्हिडिओ पहात असल्याचे व्हिडिओ प्रसारित करून तुमची अपकीर्ती करू. अशी अपकीर्ती होऊ न देण्यासाठी पटेल यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागण्यात आली. याविषयी पटेल यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी वरील दोघांना अटक केली. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार महंमद साबीर हा पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशा प्रकारे लोकांना संपर्क करून त्यांच्याकडून खंडणी उकळणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.