प्रभु श्रीराम आणि महाराणा प्रताप यांचा अवमान : महंमद शाकिब अहमद याला अटक !
वैशाली (बिहार) – ‘इन्स्टाग्राम’द्वारे प्रभु श्रीरामचंद्र आणि महाराणा प्रताप यांचा अवमान करणारा मजकूर प्रसारित केल्यावरून वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर येथे महंमद शाकिब अहमद याला अटक करण्यात आली. बजरंग दल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. अंतत: २५ जुलै या दिवशी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. २३ वर्षीय महंमदने एक आठवड्यापूर्वी हा मजकूर प्रसारित केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.
Bihar: One Md Shaqib Ahmed arrested for derogatory, obscene depiction of Lord Rama, insulting Hindus on Instagramhttps://t.co/HCPLKIQ7WD
— OpIndia.com (@OpIndia_com) July 26, 2023
संपादकीय भूमिकाअसा अवमान जर अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा करण्यात आला असता, तर पोलिसांनी स्वत:हून त्वरित कारवाई केली असती ! बहुसंख्य हिंदू असा धाक पोलीस आणि सरकारी व्यवस्था यांच्यात कधी निर्माण करणार ? |