छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
विधान परिषद प्रश्नोत्तरे…
मुंबई २६ जुलै(वार्ता.) – छत्रपती संभाीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येणार असून आवश्यक तो निधीही देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २७ जुलै या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिली. हा तारांकित प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे #औरंगाबाद येथील #हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेबठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक निधीही देण्यात येणार आहे. या स्मारकाचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. pic.twitter.com/BPRpfHwhJb
— AIR News Pune (@airnews_pune) July 27, 2023
सामंत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून ३५.१९ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. त्यांपैकी २३ कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे स्मृती वन आणि स्मारक यांचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. अद्यापपर्यंत या प्रकल्पावर ९.४० कोटी इतका निधी व्यय झालेला आहे. या स्मारकाच्या प्रलंबित कामांच्याविषयी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.