मुंबईत गॅस्ट्रो आणि लेप्टो यांच्या रुग्णांत वाढ
मुंबई – जुलै मध्ये धुंवाधार आणि सतत पाऊस पडत असल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १ सहस्र २७४ गॅस्ट्रोचे, हिवतापाचे ४१५, तर लेप्टोचे २४९ रुग्ण आहेत. डेंग्यूचे ४०६, हेपेटायटिसचे १११, स्वाईन फ्ल्यूचे ६१, तर चिकनगुनियाचे २० रुग्ण आहेत. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो होतो. वर्ष २०१८ मध्ये लेप्टोमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मुंबईकरांनी लेप्टोची धास्ती घेतली आहे.