बनावट ओळखपत्रांच्या आधारे लोकांचा पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश !
१७५ बनावट ओळखपत्रे जप्त
पुणे – महापालिकेच्या सेवेत कायम असणार्या कर्मचार्यांसारखीच ओळखपत्रे एजंट आणि कार्यकर्ते घेऊन इमारतीमध्ये प्रवेश करत आहेत. याच्या आधारे ठेकेदारांच्या धारिका मार्गी लावण्यासाठी काम केले जात आहे. त्या विरोधात प्रशासनाने बनावट ओळखपत्र जप्त करण्याची मोहीम चालू केली असून आतापर्यंत १७५ बनावट ओळखपत्रे जप्त केली आहेत. कंत्राटी पद्धतीने काम करणार्या कर्मचार्यांना संबंधित ठेकेदारांनी ओळखपत्र देणे आवश्यक आहे. त्यावर त्यांचे पद, कालावधी, विभाग आदींचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे; मात्र याकडे दुर्लक्ष करून बनावट ओळखपत्रे सिद्ध केली जात आहेत. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी असे कर्मचारी आणि एजंट यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
संपादकीय भूमिकाहा आहे पुणे महापालिकेचा कारभार ! अशा पद्धतीने कामकाज चालत असल्यास महापालिकेची सुरक्षा काय रहाणार ? |