आझाद मैदानावर आंदोलकांसाठी निवारा उभारण्‍याचे निर्देश !

मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – आझाद मैदानावर आंदोलन करणार्‍यांसाठी निवारा (शेड) उभारण्‍याचे निर्देश २६ जुलै या दिवशी विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिले. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ‘माहितीचे सूत्र’ उपस्‍थित केले होते. आझाद मैदानावर आंदोलन करण्‍यासाठी राज्‍यभरातून आलेले आंदोलक भर पावसांत आंदोलन करतात; मात्र त्‍यांना निवारा नसल्‍याचे सांगितले. त्‍यावर अध्‍यक्षांनी वरील निर्देश दिले.