‘लव्ह जिहाद’ थांबवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !
हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांचे तुळजापूर येथील ‘हिंदु गर्जना सभे’त आवाहन !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २६ जुलै (वार्ता.) – संपूर्ण देशात ‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे थांबवण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन कार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले. येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात झालेल्या हिंदु गर्जना सभेत ते बोलत होते. या सभेच्या प्रारंभी श्री तुळजाभवानीदेवीच्या प्रतिमेला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सभेचे आयोजन हिंदु राष्ट्र सेनेचे परीक्षित साळुंके यांनी केले होते. या सभेला मोठ्या संख्येने हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
या सभेला महंत मावजीनाथ महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज, महंत तुकोजीबुवा महाराज, ह.भ.प. रेड्डी महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. या वेळी धनंजय देसाई यांनी हिंदु राष्ट्र सेनेने ‘धाराशिव’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ या शहरांच्या नामांतरासाठी मागील अनेक शतकांपासून केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
विशेष – हिंदु गर्जना सभेच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला श्री. धनंजय देसाई यांनी भेट देऊन ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ खरेदी केला.