सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या सनातनच्‍या संत पू. (श्रीमती) आशा भास्‍कर दर्भेआजी यांचा कोल्‍हापूर येथे देहत्‍याग !

पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी

कोल्‍हापूर – धर्माचरणी आणि प्रेमळ स्‍वभाव असलेल्‍या कोल्‍हापूर येथील सनातनच्‍या ७१ व्‍या संत पू. (श्रीमती) आशा भास्‍कर दर्भेआजी (वय ९४ वर्षे) यांनी २२ जुलैला रात्री ९.१५ वाजता देहत्‍याग केला. त्‍यांच्‍या पश्‍चात २ मुले, २ सुना, १ मुलगी (श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी), नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. फोंडा, गोवा येथील अश्‍विनी कुलकर्णी यांच्या त्या आजी होत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

पू. आजींच्‍या संदर्भात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्‍हणाल्‍या, ‘‘पू. आजी  सतत श्री गुरूंच्‍या अनुसंधानात असून त्‍यांचा अखंड नामजप चालू आहे. त्‍यांचा पुढचा साधनाप्रवासही चांगला होणार आहे.’’

या संदर्भात अश्‍विनी कुलकर्णी म्‍हणाल्‍या, ‘‘पू. आजी सतत कृतज्ञताभावात असत. ‘श्री गुरु माझ्‍यासाठी किती करतात, मी त्‍यांच्‍यासाठी काही करू शकले नाही’, असे त्‍या सतत म्‍हणायच्‍या. ‘जीवनातील सर्व कटू प्रसंगांत देव समवेत होता. ही सर्व सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा असून ते सर्वांना सांभाळत आहेत,’ असा त्‍यांचा भाव होता. देहत्‍याग करण्‍यापूर्वी अनुमाने १५ दिवस त्‍यांचे खाणे-पिणे अत्‍यल्‍प झाले होते; मात्र त्‍याही स्‍थितीत त्‍या अगदी शांत होत्‍या. त्‍यांच्‍या देहत्‍यागानंतर त्‍या ज्‍या खोलीत होत्‍या, ती खोली आणि घर येथील चैतन्‍य अन् प्रकाश यांत वाढ झाली होती. त्‍यांच्‍या खोलीत गेल्‍यावर पोकळीत बसल्‍याप्रमाणे वाटून शांतीची स्‍पंदने जाणवत होती. तिथे एकाग्रतेने नामजप होत होता.’’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक