धुंदरे (लांजा) येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने महिला कार्यकर्त्यांचा संघटन मेळावा
लांजा, २६ जुलै (वार्ता.) – तालुक्यातील धुंदरे येथील टेकडी गणेश मंदिरात २३ जुलै या दिवशी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने लांजा आणि राजापूर येथील सक्रीय महिला कार्यकर्त्यांचा संघटन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये विश्व हिंदु परिषदेच्या वतीने संघटनात्मक कामांविषयी सांगोपांग चर्चा आणि नियोजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती महाजन यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सौ. भक्ती महाजन म्हणाल्या की, हल्ली ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे भरपूर वाढत आहेत. त्यामुळे घरातील मंडळींच्या स्वत:च्या मुलांच्या भावी आयुष्याबद्दल चिंता वाढत आहे. यासाठी उपाययोजना म्हणून आपल्या मुलांच्या हातात भ्रमणभाष (मोबाईल) गरजेपुरताच द्या. मुलांवर हिंदु धर्माचे संस्कार सातत्याने करत रहा आणि मुलांसाठी पालकांनी पुरेसा वेळ देणेही अपेक्षित आहे.
या वेळी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सर्व जणी महाविद्यालयातील तरुणींना एकत्र करून ‘लव्ह जिहाद’ विषय समजावण्यासाठी आपल्याला आमंत्रित करू, तसेच आमच्या मुला-मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करावा.
कार्यकर्त्यांचे प्रबोधन होण्यासाठी विश्व हिंदु परिषद, लांजाच्या प्रखंड मंत्री कु. प्रियवंदा जेधे यांनी विशेष प्रयत्न केले.