खासगी जागेत वीजमीटर बसतांना वनविभागाच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – खासगी जागेवर घर बांधतांना त्या ठिकाणी वीजमीटर घेण्यासाठी वनविभागाच्या नाहरकत दाखल्याची आवश्यकता नाही. भूमी वनविभागाची नसेल, तर अनुमतीची आवश्यकता नाही; मात्र ती भूमी खासगी असल्याचा पुरावा देण्याचे दायित्व महावितरणचे आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभु यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ असलेल्या काही झोपडपट्ट्यांमध्ये वीजमीटरसाठी वनविभाग अनुमती देत नसल्याची तक्रार औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत सभागृहात केली. त्यावरची भूमिका वनमंत्री मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडली.