पुढील ३ दिवस देशातील २२ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता !
नवी देहली – देशातील काही राज्यांत गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेला पाऊस अद्यापही चालूच आहे. देहलीमध्ये मुसळधार पावसामुळे मंडी हाऊसपासून रिंगरोडपर्यंत आणि उत्तरप्रदेशातील नोएडातील अनेक भागांतील रस्ते जलमय झाले आहेत. तेलंगाणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेलंगाणातील महबूबनगर येथे २ अल्पवयीन मुली कालव्यात वाहून गेल्या. वरील सर्व राज्यांतील धोक्याच्या क्षेत्रांतील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांना २६ आणि २७ जुलै या दिवशी सुटी देण्यात आली आहे. पुढील ३ दिवस उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगाणा, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश यांसह २२ हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२२ राज्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गंगा-यमुनेसह अनेक नद्या धोक्याच्या चिन्हावर https://t.co/KdBsgwDn3a #rainupdate
— Lokmat (@lokmat) July 26, 2023
दक्षिण आणि किनारी ओडिशातील अनेक भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांना २७ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.