डेन्मार्कमध्ये इजिप्त आणि तुर्कीये दूतावासांसमोर कुराण जाळले !

कोपेनहेगन – डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे २५ जुलै या दिवशी तिसर्‍यांदा इजिप्त आणि तुर्कीये दूतावासांसमोर कुराण जाळण्यात आले. या घटनेवर जगभरातील इस्लामी देशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. डेन्मार्कने या घटनेचा निषेध केला आहे; पण त्याच वेळी ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी नियमांनुसार या घटना थांबवू शकत नाही’, असे त्यांचे म्हणणे आहे.

‘डॅनिश पॅट्रियट्स’ नावाच्या एका गटाने कोपनहेगनमध्ये कुराण जाळले. या गटाने यापूर्वी इराकी दूतावासासमोर कुराण जाळले होते. गेल्या मासात अशा २ घटना स्विडनमध्येही घडल्या होत्या. तुर्कीयेने डेन्मार्कला इस्लामच्या विरोधातील द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.