पुणे येथील खडकवासला धरणातून मुठा नदीत १ सहस्र क्युसेक पाण्याचा विसर्ग !
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहाण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रशासन !
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे २५ जुलै या दिवशी सायंकाळी ५ वाजता मुठा नदीत १ सहस्र क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांनी सतर्क रहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे – खडकवासला धरण भरले
मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू#Jaimaharashtranews #Marathinews #Maharashtra #Monsoon2023— Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) July 26, 2023
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मागील ४ दिवसांपासून पावसाची संततदार चालू आहे. परिणामी पावसामुळे पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण साखळीत २४ जुलैला १२ मि.मी. पावसाची नोंद झाली. या वर्षी आजपर्यंत २२० मि.मी. पाऊस पडला असून मागील वर्षी जूनपासून २४ जुलैपर्यंत ३६६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. धरण आतापर्यंत ८७ टक्के भरले आहे. मागील वर्षी खडकवासला धरण आजपर्यंत ९१ टक्के भरले होते.