पिंपळे सौदागर (पिंपरी) येथील रस्ता खचल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हा नोंद !
पुणे – खासगी प्रकल्पाच्या बांधकामासाठी नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न करणे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, अशी घटना घडली आहे. या प्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक घन:श्याम सुखवानी आणि संजय रामचंदानी यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या पिंपळे सौदागर भागातील १५ फूट रस्ता बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे बांधकाम करताना सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता तसेच निकृष्ट दर्जाचे पायलिंग केल्याने गुरुवारी (२० जुलै) खचला. चारही बाजुंनी लोकवस्ती आणि चार शाळांचा परिसर असलेल्या… pic.twitter.com/Q3a2oWAa3e
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) July 21, 2023
पिंपळे सौदागर येथील ‘कुणाल आयकॉन’ रस्त्यावरील मे. सुखवानी रामचंदानी एल्.एल्.पी.च्या वतीने भागीदार धन:श्याम सुखवानी आणि संजय रामचंदानी यांना बांधकाम करण्यास अनुमती दिली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी पाया खोदण्यासाठी मोठा खड्डा करण्यात आला. त्यामुळे तेथील रस्ता खचल्याची घटना २० जुलै या दिवशी घडली. या प्रकरणी स्वत: आयुक्तांनी लक्ष घातल्याने संबंधित विभागातील उपअभियंता विनायक माने यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.