पुण्‍यात ५ सहस्र बांगलादेशी नागरिकांचे वास्‍तव्‍य; केवळ ५ जणच मायदेशी परतले !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – गेल्‍या काही वर्षांत ५ सहस्र बांगलादेशी कुटुंबासह पुण्‍यात वास्‍तव्‍यास आहेत; मात्र त्‍या तुलनेत मागील ३ वर्षांत केवळ ५ बांगलादेशींना पुन्‍हा मायदेशी पाठवण्‍यात आले आहे, अशी माहिती राज्‍य गुप्‍तचर यंत्रणेच्‍या सर्वेक्षणात समोर आली आहे. पोलिसांकडून बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होतांना दिसत नसल्‍याने घुसखोरांचे प्रमाण वाढत असल्‍याचे सांगितले जात आहे.

१. पुण्‍यातील हडपसर परिसरातील ससाणेनगर, तसेच वाघोली, चाकण औद्योगिक क्षेत्र, लोणी काळभोर या भागांत बांगलादेशींनी त्‍यांचे बस्‍तान बसवले आहे.

२. सीमारेषा ओलांडत हे नागरिक भारतात येताच हॉटेलमध्‍ये ‘वेटर’, बांधकाम कामगार, फेरीवाले आणि इतर कामे करत हळूहळू एकेक करत कुटुंबासह येथे स्‍थायिक होतात. हे सर्व भाड्याची खोली घेऊन रहातात, तसेच ‘आम्‍ही मूळचे बंगालचे आहोत’, असे सांगतात. पुण्‍यासह नवी मुंबईतही बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण वाढले आहे.

पोलीस दुर्लक्ष करत असल्‍यामुळेच पुण्‍यात घुसखोर मोठ्या संख्‍येने स्‍थायिक !

खरेतर बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी रोखावी, तसेच त्‍यासाठी विशेष शोधमोहीम प्रत्‍येक पोलीस ठाण्‍याअंतर्गत राबवण्‍यात यावी, असे पोलिसांना आदेश आहेत. यात बांगलादेशी व्‍यक्‍ती शोधणे, त्‍यांच्‍या कागदपत्रांची पडताळणी करणे, त्‍यांचे साथीदार शोधणे, तसेच त्‍या सर्वांना परत पाठवणे आदी कामे वेळखाऊ असल्‍याने त्‍याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचाच परिणाम म्‍हणून पुण्‍यात बांगलादेशी घुसखोर मोठ्या संख्‍येने स्‍थायिक झाल्‍याची माहिती गुप्‍तचर यंत्रणेच्‍या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

संपादकीय भूमिका :

  • एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोर वाढेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपा काढत होते का ?
  • यास उत्तरदायी असलेल्‍या पोलिसांना आजन्‍म कारागृहात टाका !