मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आणखी एक दरड कोसळली !
पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ २४ जुलैला सकाळी ६ वाजता आणखी एक दरड कोसळली होती. ही दरड लहान होती. प्रशासनाकडून तातडीने मार्गावरील ही दरड हटवण्यात आली. या दरडीमुळे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. १२ ते २ या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.