अंधेरी (मुंबई) येथे दरड कोसळली
मुंबई – अंधेरी पूर्व येथील महाकाली मार्गावर २४ जुलैला मध्यरात्री दीड वाजता दरड कोसळली. ‘रामबाग’ या ७ मजली इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावरील माती वेगाने खाली सरकू लागली. यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून इमारतीतील १६८ कुटुंबांची गुंदवली येथील महापालिका शाळेत तात्पुरती निवार्याची व्यवस्था करण्यात आली आहे.