जावेद अख्तर यांना समन्स
मुंबई – हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात अभिनेत्री कंगना राणावत यांना धमकावणे आणि तिचा अपमान केल्याप्रकरणी महानगरदंडाधिकारी यांनी समन्स बजावून ५ ऑगस्ट या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना कंगना यांनी त्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविषयी अख्तर यांनी तक्रार नोंदवली होती. कंगना यांनीही हृतिक रोशन यांची क्षमा मागण्याचा दबाव आणल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.