नाशिकमध्ये गावगुंडांकडून वाहनांची तोडफोड !
पाठलाग करण्यास निष्क्रीय पोलिसांचा नकार
नाशिक – धोंडगे मळा, जगताप परिसरात ८ ते ९ जणांच्या टोळक्याने तलवारी आणि कोयते नाचवत रात्री एकच्या सुमारास ६ वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका पोलीस अधिकार्याचे वाहनही फोडण्यात आले आहे.
नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र समाजकंटक पळून गेले. समोर उभ्या असणार्या पोलिसांना नागरिकांनी गावगुंडांचा पाठलाग करण्याची विनंती केली. मात्र गाडीची क्लचप्लेट खराब असल्याची सबब पुढे करत पोलिसांनी उदासीनता दाखवली.