श्रीहरि स्मरणाने दुःखे दूर होतात
‘जसे सूर्योदय होताच रात्र पळून जाते, सिंहाची गर्जना ऐकताच हत्तीला भीती वाटते, तसेच हरिभक्त समोर येताच संकटे पळून जातात. त्यांच्या दृष्टीच्या समोर येतच नाहीत. जसे महालक्ष्मी येताच दरिद्री माणसाचे दारिद्य्र दूर होते, तसेच (सर्वव्यापक, सर्वांचे अंतरात्मा) श्रीहरीचे स्मरण केल्याने जन्म-मरणरूपी दुःख दूर होते.’ – संत श्री निळोबा महाराज
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०२०)
तुम्ही जेथे आहात, जसे आहात, त्याच वेळी सुखसागर तुमच्या चित्तात आहे !
‘ही मोठ्यात मोठी चूक आहे की लोक मानतात : ‘आपण जेथे आहोत, तेथे सुख नाही, अन्य कुठेतरी जाऊ तेव्हा सुख होऊ. तथापि असे नाही. तुम्ही जेथे आहात आणि जसे आहात त्या वेळी सुखसागर तुमच्या चित्तात आहे.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, वर्ष २०२२, अंक ३५०)
प्रदक्षिणा घालतांना घ्यावयाची काळजी !
१. प्रदक्षिणेच्या वेळी मनात निंदा, दुर्गुण, दुर्भावना, क्रोध, तणाव वगैरे विकार येऊ देऊ नका. मनात मंत्रजप करत किंवा शांत भावाने प्रदक्षिणा घाला.
२. चपला-जोडे काढून प्रदक्षिणा घाला.
३. प्रदक्षिणा घातल्यानंतर इष्टदेवतेला किंवा सद़्गुरुदेवांना प्रार्थना करून काही मिनिटे अगदी शांत होऊन बसा. याने विशेष लाभ होतो.
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, वर्ष २०२२, अंक ३५०)