पालटणार्या राजकीय स्थितीमुळे विधीमंडळाच्या समित्या रखडल्या ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – राज्यात सतत होत असलेल्या राजकीय पालटांमुळे विधीमंडळाच्या समित्या रखडल्या आहेत, अशी स्वीकृती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. विधीमंडळाचे कामकाज चालवण्याच्या दृष्टीने या समित्यांची स्थापना होणे, हे अतिशय महत्त्वाचे असून विधीमंडळाचे अधिवेशन झाल्यानंतर या समित्या स्थापन करण्याकडे लक्ष देणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिले.
काँग्रेसचे गटनेते नाना पटोले यांनी याविषयी औचित्याचे सूत्र सभागृहात उपस्थित केलेल्या या प्रश्नावर अध्यक्षांनी वरील वक्तव्य केले. विधीमंडळात दिलेली आश्वासनांची पूर्तता करणे, अहवालांचा अभ्यास करणे आदी महत्त्वाचे काम या समित्यांकडून केले जाते. नवीन सरकार स्थापन होऊन १ वर्ष झाले, तरी अद्याप या समित्यांची स्थापना करण्यात आलेली नाही.