राज्यात केळी संशोधन केंद्राची स्थापना होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
५० कोटी रुपयांची तरतूद !
मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासह केळी संशोधन केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. आमदार सावकारे यांनी राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याच्या शासनाच्या घोषणेवर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचा विषय औचित्याच्या सूत्राखाली सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.
#विधानसभाकामकाज #केळी पिकाच्या संशोधनासाठी राज्यात #केळी_महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. pic.twitter.com/twyMAG9JT3
— AIR News Pune (@airnews_pune) July 25, 2023