डॉ. तात्‍याराव लहाने यांनी राजकारणामुळे त्‍यागपत्र दिल्‍याचा आरोप सरकारने फेटाळला !

डॉ. तात्‍याराव लहाने

मुंबई, २४ जुलै (वार्ता.) – जे.जे. रुग्‍णालयातील नेत्ररोगतज्ञ समन्‍वयक डॉ. तात्‍याराव लहाने यांनी त्‍यांच्‍या पदाचे त्‍यागपत्र राजकारणामुळे दिल्‍याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत फेटाळला. डॉ. लहाने यांनी दिलेल्‍या त्‍यागपत्राविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी २४ जुलैला याविषयी तारांकित प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

याविषयी माहिती देतांना हसन मुश्रीफ यांनी डॉ. लहाने जे.जे. रुग्‍णालयातून ३० जून २०११ या दिवशी निवृत्त झाले. ११ ऑगस्‍ट या दिवशी शासनाच्‍या ‘मोतीबिंदूमुक्‍त महाराष्‍ट्र’ या कार्यक्रमाचे समन्‍वयक म्‍हणून डॉ. लहाने यांची नियुक्‍ती केली. ‘मार्ड’ या संघटनेच्‍या नेत्र विभागातील निवासी डॉक्‍टरांनी ‘डॉ. लहाने हे शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी देत नाहीत’, अशी तक्रार केली होती. यानंतर ३ मासांचा कार्यकाळ शिल्लक असूनही डॉ. लहाने यांनी पदाचे त्‍यागपत्र दिले. यामध्‍ये कोणतेही राजकारण झालेले नाही, असे सांगितले. या वेळी भाजपचे आमदार योगेश सागर म्‍हणाले की, डॉ. लहाने यांच्‍या विरोधात विद्यार्थ्‍यांनी केलेल्‍या तक्रारींना सरकारने गंभीरपणे घेतलेे. याची निष्‍पक्षपाती अन्‍वेषण करण्‍याची मागणी केली; मात्र हसन मुश्रीफ यांनी डॉ. लहाने यांनी स्‍वत:हून त्‍यागपत्र दिल्‍याची पुनरावृत्ती केली.


पावसाळी अधिवेशनानिमित्त ‘सनातन प्रभात’च्‍या विशेष प्रतिनिधींना विविध मंत्री आणि आमदार यांनी दिलेल्‍या मुलाखतींचे व्‍हिडिओ पहाण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/3Q2gyIc

व्‍हिडिओ पहाण्‍यासाठी QR code :