एका धर्मप्रेमीने सनातन संस्थेचे ग्रंथ अमूल्य असल्याचे सांगून ग्रंथांच्या मूल्यापेक्षा अधिक पैसे देणे
सनातन संस्थेच्या कार्याला समाजातून मिळणारा उत्तम प्रतिसाद !
मी सोलापूर येथील एका धर्मप्रेमींना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याविषयीचे ग्रंथ दिले, तसेच ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन : भाग ५’ हा ग्रंथ दिला. तेव्हा त्या धर्मप्रेमींनी ग्रंथांच्या अर्पण मूल्यांपेक्षा काही पैसे अधिक दिले. ‘‘हे अधिक पैसे कशाला दिले ?’’, असे मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही जे ग्रंथ दिलेत, ते अमूल्य आहेत. त्यापुढे हे अधिक दिलेले पैसे काहीच नाहीत.’’
– श्री. संकेत, सोलापूर (११.७.२०२२)