‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवाकेंद्रातील सेवा करणार्या आणि प्रेमाने बोलून साधकांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणार्या सद़्गुरु स्वाती खाडये !
१. ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवाकेंद्रातील सेवा करणार्या सद़्गुरु स्वाती खाडये !
अ. ‘सोलापूर सेवाकेंद्रात लावलेल्या फुलझाडांच्या रोपांकडे सद़्गुरु स्वातीताईंचे सतत लक्ष असते. ती रोपेे चांगली येण्यासाठी सद़्गुरु स्वातीताई वेगवेगळे उपाय करतात आणि त्या रोपांना पाणी घालतात.
आ. सेवाकेंद्रात वावरतांना त्यांना अयोग्य जागी किंवा अव्यवस्थित ठेवलेले साहित्य दिसले, तर त्या ते साहित्य लगेच व्यवस्थितपणे आणि योग्य ठिकाणी ठेवतात.
२. अत्यल्प अहं
सद़्गुरु स्वातीताई स्वतः सद़्गुरु असूनही सेवाकेंद्रासाठी भाजी अर्पण घेण्याच्या सेवेसाठी बाजारात येतात.
३. राष्ट्रप्रेम
सद़्गुरु स्वातीताई राष्ट्रद्रोही ‘हलाल’ प्रमाणित वस्तू कधीच वापरत नाहीत. त्यांना कुणी ‘हलाल’ प्रमाणित वस्तू देत असेल, तर त्या स्पष्टपणे सांगतात, ‘‘आम्ही ‘हलाल’ प्रमाणित वस्तू वापरत नाही.’’
४. सद़्गुरु स्वातीताईंच्या संकल्पातील अनुभवलेले सामर्थ्य !
४ अ. ‘आळस’, हा स्वभावदोष दूर होणे : एकदा सद़्गुरु स्वातीताई मला म्हणाल्या, ‘‘मी तुझ्यातील ‘आळस’ हा स्वभावदोष दूर करणार आहे.’’ त्यानंतर काही मासांतच माझ्यातील ‘आळस’ हा स्वभावदोष दूर झाला.
४ आ. प्रचारसेवा करायला जमू लागणे : आरंभी मला प्रचाराची सेवा व्यवस्थित जमायची नाही; म्हणून त्याविषयी एकदा मी सद़्गुरु स्वातीताईंना सांगितल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘तुला प्रचाराची सेवा जमणार आहे.’’ तेव्हापासून मला प्रचारसेवा जमायला लागली.
४ इ. ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रकियेच्या परीक्षेत पास होणार’, असे सद़्गुरु स्वातीताईंनी सांगितल्यावर साधनेच्या प्रयत्नांत वाढ होणे : मी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रकियेला (टीप) गेलो होतो. तेव्हा मला स्वयंपाकघरात एकाच ठिकाणी सेवा करायचा कंटाळा यायचा. मला मौन पाळण्याची शिक्षाही दिली होती. त्याचेही माझ्याकडून पालन व्हायचे नाही; म्हणून सद़्गुरु स्वातीताईंना हे सांगण्यासाठी मी दूरभाष केल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘तुला नक्की जमेल, तू त्यात पास होणार आहेस.’’ त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या मनाला उभारी आली आणि साधनेच्या प्रयत्नांना गती आली.’
टीप : स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या अयोग्य कृती अन् विचार वहीत लिहून त्यापुढे योग्य कृती आणि विचार लिहिणे अन् दिवसातून १०-१२ वेळा मनाला तशी सूचना देणे यातून ‘संतांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा त्यांचा संकल्प असतो’, हे मला शिकता आले.’
– श्री. संकेत, सोलापूर सेवाकेंद्र (११.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |