टिपू सुलतानवरील ‘टिपू’ चित्रपट बनवणे रहित !
मुंबई – चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी टिपू सुलतान याच्या जीवनावरील ‘टिपू’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा काही मासांपूर्वी केली होती. ‘टिपू सुलतानविषयी जे आतापर्यंत सांगण्यात आले होते, त्याची दुसरीबाजू या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत’, असे सिंह यांनी म्हटले होते; मात्र आता हा चित्रपट बनवण्यात येणार नाही, अशी घोषणा सिंह यांनी ट्वीट करून केली आहे.
‘टिपू’ चित्रपट प्रदर्शित होणार नाही, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा…https://t.co/srx5Fjgo8C#timemaharashtra #Tipu #TipuSultan
— Time Maharashtra (@TimeMaharashtra) July 24, 2023
संदीप यांनी यांनी लिहिले आहे की, हजरत टिपू सुलतान याच्यावर कोणताही चित्रपट येणार नाही. मला, माझ्या कुटुंबाला, मित्र परिवाराला कुणीही आता धमक्या देऊ नये, अशी मी विनंती करतो. नकळतपणे मी जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा तसा उद्देश अजिबात नव्हता. आपण भारतीय म्हणून एकत्र येऊन एकमेकांचा आदर करायला हवा.