रा.स्व. संघाचे माजी सह-सर कार्यवाह मदनदास देवी यांचे निधन !
नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मदनदास देवी यांचे बेंगळुरूतील रुग्णालयात निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. ते दीर्घकाळ अंथरुणाला खिळून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त करत म्हटले, ‘‘मदनदास देवी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले. माझा त्यांच्याशी जवळचा सहवास तर होताच; पण त्यांच्याकडून मला पुष्कळ काही शिकायला मिळाले.’’
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के संगठन मंत्री एवं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सह सरकार्यवाह रहे श्रद्धेय मदन दास देवी जी को विनम्र श्रद्धांजलि🙏 pic.twitter.com/bu9YUBr2lR
— Vsk Braj (@vskbraj) July 24, 2023
मदनदास देवी हे जवळपास ६ दशके रा.स्व. संघाचे प्रचारक होते. त्यांनी संघाचे सह सरकार्यवाह म्हणूनही काम पहिले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मदनदास देवी यांनी संघ आणि भाजप यांच्यात समन्वयक म्हणून काम केले होते. आजारपणामुळे ते दीर्घकाळ संघाच्या कार्यापासून दूर होते.