मध्यप्रदेशात धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत मुसलमानांकडून पोलीस ठाण्यासमोर हैदोस !
भोपाळ – राज्यातील विदिशा येथील सिरोंज येथील बृजेश यादव यांनी २० जुलै या दिवशी सामाजिक माध्यमांतून एक मजकूर प्रसारित केला होता. यावर मुसलमानांनी ‘आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून संबंधितांवर कारवाई करा’, असा कांगावा करत पोलीस ठाण्यासमोर हैदोस घातला. यावर पोलिसांनी यादव यांना हा मजकूर सामाजिक माध्यमांतून पुसून टाकण्यास (डिलीट करण्यास) सांगितला. यादव यांनी तत्परतेने तो पुसून टाकला. या प्रकरणी पोलिसांनी प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्ट केला असून चौकशीस आरंभ केला आहे. असे असतांनाही दुसर्या दिवशी मुसलमान पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाले आणि त्यांनी ‘यादव यांच्या घरावर बुलडोझर चालवा’, अशी मागणी केली. ‘यादव यांनी प्रसारित केलेल्या मजकुराची चौकशी चालू आहे’, असे पोलिसांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा जमावावर परिणाम झाला नाही. जमावाने ‘पोलिसांनी यादव यांच्यावर कारवाई न करता त्यांना सोडून दिले’, असा आरोप केला. जमाव हिंसक होत आहे, हे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार केला.
संपादकीय भूमिकामुसलमानांच्या कथित धार्मिक भावना दुखावल्यावर ते नेहमीच घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब न करता कायदा हातात घेतात, हे वारंवार सिद्ध होते. अशांवर वचक बसवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! |