‘ओपेनहायमर’ चित्रपटातून श्रीमद्भगवद्गीतेचा अवमान होणार्या प्रसंगाला अनुमती कशी दिली ?
|
नवी देहली – ‘ओपेनहायमर’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे अभितेने सिलियन मर्फी आणि चित्रपटातील अभिनेत्री यांच्यात चित्रित झालेल्या शारीरिक संबंधांच्या प्रसंगामध्ये सिलियन मर्फी म्हणजेच ओपेनहायमर हे श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन करतांना दाखवण्यात आले आहे. याचा हिंदू आणि त्यांच्या संघटना यांच्याकडून विरोध होऊ लागला आहे. आता याविषयी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून (सेन्सॉर बोर्डाकडून) असा प्रसंग दाखवण्यासाठी संमती तरी कशी मिळाली ?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच हा प्रसंग काढण्यासाठी समाजातून सेन्सॉर बोर्डावर दबाव आणला जात असल्याचेही म्हटले आहे.
‘ओपनहायमर’मधील सेक्स करताना भगवद्गीता वाचण्याचा सीन हटवणार; मंत्री अनुराग ठाकूर यांनी सेन्सॉर बोर्डला खडसावले#Oppenheimer #Controversy #ChristopherNolan #CillianMurphy #AnuragThakur #CBFC https://t.co/J3hsxMiR02
— LoksattaLive (@LoksattaLive) July 24, 2023
संपादकीय भूमिकासेन्सॉर बोर्ड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्याच्याकडून अशा प्रकारच्या चुका कशा होतात ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात नेहमीच उपस्थित होतो. सरकारने या मंडळामध्ये हिंदु धर्माचे अभ्यासक आणि हिंदु धर्माभिमानी लोकांना नियुक्त करावे, असेच हिंदूंना वाटते ! |