न्यायालयांच्या परिसरात केवळ म. गांधी आणि संत तिरुवल्लुवर यांच्याच प्रतिमा लावण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा पुतळा उभारता येणार नसल्याचेही सांगितले !
चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने परिपत्रक प्रसारित करत सांगितले की, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील न्यायालयांच्या परिसरात केवळ म. गांधी अन् संत तिरुवल्लुवर यांच्या प्रतिमा आणि पुतळेच लावले जावेत. अन्य कुणाच्याही प्रतिमा आणि पुतळे न्यायालयाच्या परिसरात लावता येणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्याच्या विनंती अमान्य करण्यात आली आहे, तसेच जेथे-जेथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत, त्या काढव्यात, असा आदेशही न्यायालयाने दिला.
‘आंबेडकर नहीं, कोर्ट परिसर में सिर्फ गाँधी और तिरुवल्लुवर की तस्वीरें’: मद्रास हाईकोर्ट एक आदेश, कहा – बाकी सब हटाओ#MadrasHighCourt #BRAmbedkarhttps://t.co/2r3cSgw0pp
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 23, 2023
न्यायालयाने हा निकाल देतांना वर्ष २००८, २०१०, २०११, २०१३, २०१९ आणि एप्रिल २०२३ मध्ये स्वतः दिलेल्या आदेशांचा उल्लेख केला. ‘तमिळनाडू बी.आर्. अंबेडकर अॅडव्होकेट असोसिएशन’ने तमिळनाडूच्या सर्व न्यायालयांच्या आवारात डॉ. आंबेडकर यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमा लावण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने त्याच्या आधीच्या आदेशांचा पुनरुच्चार केला.