झारखंडमधील सरकारी शाळेचा मुख्याध्यापक महंमद शमशाद अलीने १२ हून अधिक विद्यार्थिनींचे केले लैंगिक शोषण !
लोकांना घटनेची माहिती मिळताच महंमदला केली मारहाण !
रांची (झारखंड) – येथील एका सरकारी विद्यालयाचा मुख्याध्यापक महंमद शमशाद अली याने १२ हून अधिक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच संतप्त लोकांनी मंहमदला गाठून त्याला मारहाण केली. विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की, महंमद काहीतरी कारण काढून त्यांना त्याच्या कक्षात बोलावत असे आणि त्यांचे लैंगिक शोषण करत असे. महंमदने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहेत.
Jharkhand: Angry parents thrashed Govt school principal #MohdShamshadAli for inappropriately touching girl students https://t.co/fq85UjsJpa
— Organiser Weekly (@eOrganiser) July 22, 2023
या घटनेची नोंद घेत भाजपचे झारखंड प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी एका पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना लिहिलेले पत्र ट्वीट करून म्हटले की, हे पत्र एका असाहाय्य पित्याने बरहेट-साहिबगंज येथील पोलीस अधिकार्याला लिहिले आहे. हे पत्र वाचल्यावर मन उदविग्न होते. यामध्ये लिहिले आहे की, मुख्याध्यापक महंमद शमशाद अली त्यांच्या १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या खासगी भागांना स्पर्श करत असे. यामुळे तिने शाळेत जाणे सोडून दिले होते. याविषयी तिच्या कुटुंबियांनी विचारले असता तिने मुख्याध्यापकाच्या कृत्यांविषयी सांगितले. हे प्रकरण सर्वांसमोर आल्यावर अन्य विद्यार्थिनींनीही त्यांच्यासमवेत असाच प्रकार झाल्याचे सांगितले.
मरांडी यांनी पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे हे विधानसभा मतदारसंघ असून सोरेन स्वत: याची घेतील, अशी अपेक्षा करतो. मुख्याध्यापकाचा धर्म पाहून त्याच्यावर कारवाई करण्यास कोणताही विलंब केला जाऊ नये.
संपादकीय भूमिका
|