कॅनडा येथे चारचाकी गाडीच्या चोरीला विरोध करणार्या हिंदु विद्यार्थ्याची हत्या
टोरंटो (कॅनडा) – येथे चारचाकी वाहनाची चोरी करण्यास विरोध केल्याने गुरविंदर नाथ या २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर आक्रमण करण्यात आले. यात त्याचा मृत्यू झाला. हा विद्यार्थी महाविद्यालयातील सुटीच्या काळात पिझ्झा वितरणाचे काम करत होता. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. गुरविंदर रात्री २ वाजण्याच्या सुमारास पिझ्झा वितरणासाठी जात असतांना काही जण चारचाकी गाडीची चोरी करत असल्याचे त्याला दिसून आले. त्यांना गुरविंदर याने विरोध केला असता त्या लोकांनी गुरविंदर याला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
Indian Student Killed By Car Robbers In #Canada While Delivering Pizza.https://t.co/mKSv6DLRld pic.twitter.com/4bqORjNn1H
— TIMES NOW (@TimesNow) July 24, 2023