संगणकीय प्रणालीद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पहातांना बिहार येथील साधकांना आलेल्या अनुभूती !
१. सौ. आशा रंजीत प्रसाद, गया, बिहार
अ. ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी रांगोळी काढतांना ‘कमळाच्या फुलामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांंच्या चरण पादुका ठेवल्या आहेत आणि तेथे ते प्रत्यक्ष उभे आहेत’, असे मला जाणवले. असाच अनुभव माझी मुलगी चि. देवश्री हिलाही आला.
आ. परात्पर गुरुदेवांच्या रथयात्रेला आरंभ झाला. तेव्हा ‘आपणच मला आपल्या आश्रयाला घ्यावे’, अशा अर्थाचे भजन लावले होते. त्या वेळी मी प्रार्थना केली, ‘गुरुदेव, आपणच माझे सर्व स्वभावदोष दूर करून मला आपल्या चरणी घ्यावे. माझ्याकडून प्रयत्न होत नाहीत. आज माझे मन आपणच रिकामे करावे.’ तेव्हा माझी भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. अशा प्रकारची भावाश्रू येण्याची अनुभूती मला पूर्वी आली नव्हती.’
२. कु. योगेश रंजीत प्रसाद (वय १२ वर्षे), गया, बिहार
अ. ‘आम्ही कार्यक्रमासाठी पटलावर कापड अंथरत होतो. तेव्हा त्या ठिकाणी दिवा लावल्यामुळे त्या कापडाला आग लागली. कापड जळण्याआधीच आम्ही आग विझवली. तेव्हा ‘परात्पर गुरुदेवांनीच ती आग अधिक पसरू दिली नाही’, असे आम्हाला वाटले.
आ. कार्यक्रमाच्या वेळी माझ्याकडून प्रार्थना होत होत्या. तेव्हा मला स्वतःच्या स्वभावदोषांचे स्मरण वारंवार होत होते. माझ्याकडून ‘हे गुरुदेवा, आपणच माझ्या स्वभावदोषांना त्वरित नष्ट करावे’, अशी प्रार्थना होत होती.
इ. कार्यक्रमाच्या वेळी अधूनमधून माझ्या अंगावर रोमांच येत होते. मला पुष्कळ आनंद मिळत होता.’
(लेखातील सूत्रांचा दिनांक १८.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |