अंकलगे (अक्कलकोट) येथे वानराच्या मृत्यूनंतर मिरवणूक काढून अंत्यविधी !
गावात मारुतीचे मंदिर बांधण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे येथे २२ जुलै या दिवशी एका वानराचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी मिरवणूक काढून वानराचा अंत्यविधी केला, तसेच वानराला ज्या ठिकाणी पुरण्यात आले त्या जागेत हनुमान मंदिर बांधणार असल्याची माहिती सरपंच मारुति कोळी यांनी दिली. मागील २ मासांपासून १० ते १२ वानरांचा कळप अंकलगे गावात फिरत आहे. २२ जुलैच्या सकाळी एका वानराचा इलेक्ट्रीक वायरला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी वानराच्या अंत्यविधीची सिद्धता केली.