आर्.डी.एक्स.ने भरलेला टँकर गोव्याला जात असल्याचा मुंबई पोलिसांना भ्रमणभाष
मुंबई – पोलिसांना पांडे नावाच्या व्यक्तीने भ्रमणभाष करून सांगितले की, आर्.डी.एक्स.ने भरलेला पांढरा टँकर मुंबईहून गोव्याला जात आहे. त्यात २ पाकिस्तानी आतंकवादी आहेत. यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी गोवा पोलीस, आतंकवादविरोधी पथक, महाराष्ट्र पोलीस यांना माहिती दिली आहे. गेल्या मासात पोलिसांना अशा प्रकारचे विविध भ्रमणभाष येत आहेत. या माध्यमातून पोलिसांना विनाकारण त्रास दिला जात आहे.