पुष्कळ सोपे आहे र्हास थांबवून स्वतःचा विकास करणे !
१. व्यर्थ चिंतन
‘व्यर्थ चिंतनाचा त्याग करावा. व्यर्थ चिंतन हटवण्यासाठी अधूनमधून ‘ॐ’काराचे उच्चारण, स्मरण करावे. व्यर्थ चिंतनाने शक्तीचा र्हास होतो, विवंचना होत रहाते. त्यात बरीच शक्ती खर्च होते. भगवद़्-उच्चारण, स्मरण याने व्यर्थ चिंतनाचा अंत होतो.
२. व्यर्थ बोलणे
१० शब्द बोलायचे असतील आणि ते जर तुम्ही ६ शब्दांत सांगाल, तर तुमचे बोलणे प्रभावशाली होईल. १० ऐवजी ५० शब्द बोलतात, तर कुणी ऐकतही नाही. १० ऐवजी फार तर १२ शब्द तर चालतील; पण २० शब्द बोलाल, तर लोकांनाही कंटाळा येईल. मोजून-मापून बोलले पाहिजे. भ्रमणभाषवरही तसेच बोलले पाहिजे. व्यर्थ विधानांपासून वाचायचे असेल, तर भगवद़्-स्मरणात, शांत वातावणात डुंबत रहा, त्यामुळे व्यर्थ बडबडीपासून वाचाल.
३. व्यर्थ दर्शन
‘हे पहा, ते पहा’ यापेक्षा भगवंत आणि सद़्गुरु यांनाच पहाण्याची सवय लावा. त्यामुळे व्यर्थचे पहाणे न्यून होईल आणि पुढे बंद होईल.
४. व्यर्थचे ऐकणे
व्यर्थचे ऐकण्याची सवय असते. टीव्हीवर व्यर्थचे पहातात, ऐकतात. त्यामुळे चुकीचे संस्कार होतात. यापेक्षा भगवंताला पहा आणि भगवद़्कथा-सत्संग ऐका.
५. व्यर्थचे काही करू नका !
इकडे-तिकडे जाण्यापेक्षा सत्संगात जा आणि सेवेसाठी फिरा, त्यामुळे व्यर्थचे फिरणे बंद होईल. व्यर्थचे चिंतन, बोलणे, पहाणे, ऐकणे आणि फिरणे यांमुळे शक्तीचा र्हास होतो.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जुलै २०२०)