कलियुगातील या घोर आपत्‍काळात ग्रंथनिर्मिती करून धर्मसंस्‍थापनेचे अवतारी कार्य करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

१. सनातन संस्‍थेचे कार्य कालानुरूप आणि अवतारी असणे

‘सप्‍तर्षी जीवनाडीपट्टीच्‍या वाचनात ‘महर्षींनी सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना ‘श्रीहरि विष्‍णूचा अवतार’ का म्‍हटले आहे ?’, तसेच सनातन संस्‍थेने प्रकाशित केलेल्‍या ग्रंथांना ‘पाचवा वेद’ किंवा ‘कलियुगातील वेद’, असे का म्‍हटले जाते ?’, हे समजून घेतले, तर सनातन संस्‍थेचे कार्य कालानुरूप आणि अवतारी आहे’, हे लक्षात येईल.

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२. अनेक भारतीय आणि विदेशी भाषा यांत ग्रंथनिर्मिती करून धर्मसंस्‍थापना करण्‍याचा प्रयत्न करणारे परात्‍पर गुरुदेव !

कलियुगातील या काळात धर्मविरोधी शक्‍तींनी हिंदु धर्म संपवण्‍याचा कट करून संस्‍कृत भाषेला जाणीवपूर्वक ‘मृत भाषा’ म्‍हणून घोषित केले. या पार्श्‍वभूमीवर ‘प्रत्‍येक व्‍यक्‍तीला तिच्‍या मातृभाषेत धर्मग्रंथांचे ज्ञान मिळून साधना करणे सुलभ व्‍हावे’, यासाठी परात्‍पर गुरुदेवांनी अनेक भारतीय आणि विदेशी भाषांत ग्रंथनिर्मिती केली असून अजूनही करत आहेत. याद्वारे परात्‍पर गुरुदेव धर्म संपवण्‍याचा (धर्मग्‍लानीचा) कट निष्‍फळ करून धर्मशिक्षण आणि साधना यांद्वारे धर्मसंस्‍थापना करण्‍याचा प्रयत्न करत आहेत.

३. प्रत्‍येकाला मातृभाषेत धर्मशिक्षण देण्‍यासाठी आणि साधनेविषयी मार्गदर्शन करण्‍यासाठी परात्‍पर गुरुदेवांचे ग्रंथनिर्मितीचे कार्य चालू असणे

भारतात संस्‍कृत भाषा शिकवण्‍याची व्‍यापक सोय नसल्‍यामुळे आध्‍यात्मिक पारतंत्र्यात असलेल्‍या आणि संस्‍कृत येत नसणार्‍या समाजाला संस्‍कृत श्‍लोक सांगून किंवा त्‍यांच्‍याशी संस्‍कृतमध्‍ये बोलून त्‍यांना प्रभावित करता येईल; पण त्‍यांना धर्म किंवा साधनामार्ग यांवर चालवणे शक्‍य होणार नाही. ही गोष्‍ट लक्षात घेऊन ‘प्रत्‍येकाला मातृभाषेत धर्मशिक्षण देण्‍यासाठी आणि साधनेविषयी मार्गदर्शन करण्‍यासाठी परात्‍पर गुरुदेवांचे ग्रंथनिर्मितीचे कार्य चालू असून ‘सनातन ग्रंथमाला’ हे कार्य सहजतेनेे करत आहे’, हे लक्षात येते.

४. परात्‍पर गुरुदेवांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्‍यांचे समष्‍टी कार्य यांतूनत्‍यांच्‍या अवतारी कार्याची प्रचीती येणे

‘भगवान श्रीकृष्‍णाने श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेत जे ज्ञान सांगितले आहे, ते प्रत्‍यक्ष आचरणात कसे आणायचे ? ईश्‍वरप्राप्‍तीसह धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यात सहभागी होऊन जीवनाचा उद्धार कसा करायचा ?’, हे परात्‍पर गुरुदेवांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्‍यांचे समष्‍टी कार्य यांतून साध्‍य होत आहे. यातून त्‍यांच्‍या अवतारी कार्याची प्रचीती येते.

वरील विवेचनावरून सप्‍तर्षी जीवनाडीपट्टी वाचनात महर्षींनी ‘परात्‍पर गुरुदेव हे ‘श्रीहरि विष्‍णूचे अंश’ आहेत. ते धर्मसंस्‍थापनेचे अवतारी कार्य करत आहेत’, असे सांगणे किती सार्थ आणि सत्‍य आहे !’, हे अनुभवता येते.’

– (सद़्‍गुरु) डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (जानेवारी २०२२)