रामनगर (कर्नाटक) येथे अज्ञात गोतस्करांनी ४ गायींची हत्या करून मांस पळवले !
रामनगर (कर्नाटक) – अज्ञात गोतस्करांनी २१ जुलैच्या रात्री जिल्ह्यातील बगीनगेरे या गावातील एका शेतकर्याच्या गोठ्यातून ४ गायींची चोरी केली. त्या गायींना शेजारच्या शेतात नेऊन त्यांची हत्या करून त्यांचे मांस अन् चर्म काढून घेण्यात आले. गायीच्या देहाचे उरलेले भाग तेथेच टाकून चोर पळून गेले. या गायी रामय्या नावाच्या शेतकर्याच्या होत्या. या गायींचे एकूण मूल्य अनुमाने २ लाख रुपये होते. रामय्या यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
सामान्यतः गायी चोरल्यानंतर कुणाला समजणार नाही, अशा रीतीने त्यांना लपवून ठेवणे अथवा त्यांची तस्करी करून दूर पाठविणे, असे केले जाते; परंतु या प्रकरणात चोरट्यांनी त्यांना कुणाचेही भय नसल्याप्रमाणे वर्तन केल्याची चर्चा गावात होत आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेसची सत्ता असतांना यापेक्षा वेगळे काय घडणार ? |