(म्हणे) ‘संघ परिवाराच्या धोरणांमुळे मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी समाजाच्या विरोधात हिंसाचार !’ – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांची गरळओक !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – देशातील धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही समाजाने हे लक्षात घेतले पाहिजे की, संघ परिवाराच्या (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या) धोरणांमुळे मणीपूरचे दंगलग्रस्त भूमीत रूपांतर झाले आहे. संघ परिवाराकडून तिथे द्वेषाची पेरणी केली जात आहे. दंगलीच्या नावाखाली मणीपूरमध्ये ख्रिस्ती समुदायाला लक्ष्य केले जात आहे. ख्रिस्ती आदिवासी समुदायाच्या चर्चवर आक्रमणे केली जात आहेत, अशी टीका केरळमधील माकपप्रणीत आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी केली आहे.
केरल के मुख्यमंत्री पिनराई विजयन ने मणिपुर की घटना पर बीजेपी-आरएसएस पर निशाना साधा. उन्होंने कहा कि संघ परिवार के एजेंडे ने मणिपुर को दंगा जोन में बदल दिया. #ManipurViolence #ManipurIncident #PVijayan #BJP #RSShttps://t.co/MUNY7Oe8mn
— ABP News (@ABPNews) July 22, 2023
मुख्यमंत्री विजयन् पुढे म्हणाले की, मणीपूरमधून प्रतिदिन नवनवीन धक्कादायक घटना समोर येत आहेत.हिंसाचाराच्या प्रारंभीच्या दिवसांची काही दृश्ये आता समोर आली आहेत. ख्रिस्ती कुकी समुदायातील महिलांना हिंसक जमावाने अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने वागणूक दिली आहे. मणीपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे लोक कर्तव्य बजावत आहेत, तेच लोक हिंसाचाराला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचे मौन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण आता उघडे पडत आहे. जातीय ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना पराभूत करणे, ही लोकशाहीवर विश्वास ठेवणार्या सर्वांचे दायित्व आहे.
संपादकीय भूमिका
|