हजारीबाग (झारखंड) येथील शादाबच्या प्रेमात पडलेली ‘बार्बरा’ पोलंडहून आली भारतात !
सीमा हैदरसारखे दुसरे प्रकरण उजेडात !
नवी देहली – ‘पब्जी’ या ऑनलाइन खेळाच्या माध्यमातून सचिन नावाच्या भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या पाकमधील सीमा हैदर हिचे प्रकरण ताजे असतांनाच आता झारखंडमधील ‘इन्स्टाग्राम’द्वारे भारतीय व्यक्तीच्या प्रेमात पडलेली पोलंडमधील महिला भारतात आली आहे. वर्ष २०२१ मध्ये ‘इन्स्टाग्राम’द्वारे ‘बार्बरा’ या ४९ वर्षीय पोलिश महिलेची ओळख झारखंडमधील हजारीबाग येथील शादाब आलम याच्याशी झाली. पुढे दोघांचे प्रेम जडले आणि आता बार्बरा तिच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी अनन्या (वय ६ वर्षे) हिच्यासह भारतात आली आहे. ती पर्यटन व्हिसावर भारतात ५ वर्षे राहू शकणार आहे. तिने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला आहे. ती हजारीबाग येथील बरतुआ गावात शादाबसह रहात असून लवकरच दोघे विवाहबद्ध होणार आहेत.
A 49-year-old woman from #Poland flew to India to live with her Indian lover in #Jharkhand‘s Hazaribag, whom she had befriended on Instagram https://t.co/pHVsoX5U54
— Hindustan Times (@htTweets) July 19, 2023
संपादकीय भूमिका
प्रेमाच्या नावाखाली अशा विदेशी महिलांचे अन्य कुठले मनसुबे नाहीत ना ?, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पडताळून पहाणे आवश्यक आहे ! |