५६ टक्के तरुणी, तर ३२ टक्के पुरुष घरापासून दूर असल्यावर शारीरिक संबंध ठेवतात !
केंद्रशासनाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा निष्कर्ष !
नवी देहली – केंद्रशासनाकडून राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे) करण्यात आले. यामध्ये भारतियांना एच्.आय.व्ही. आजाराविषयी काही प्रश्न विचारण्यात आले असले. त्यांतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पती आणि पत्नी बाहेर अन्य लोकांशी शारीरिक संबंध ठेवत अल्याचे समोर आले आहे. यामुळे एच्.आय.व्ही. आजार होण्याचा धोका वाढतो, असे निदर्शनास आले आहे. ५६ टक्के तरुणींनी मान्य केले की, त्या घराबाहेर असल्यावर शारीरिक संबंध ठेवतात, तर ३२ टक्के पुरुष घराबाहेर असतांना संबंध ठेवण्यास प्राधान्य देतात.
56% मुली घरापासून दूर असल्यावर शारीरिक संबंध…; सरकारच्या अहवालात मोठा खुलासाhttps://t.co/xeYkuV2CgQ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 22, 2023
१. या सर्वेक्षणात १५ ते ४९ वयोगटांतील महिला आणि पुरुष यांना त्यांच्या एका वर्षातील लैंगिक जीवनाविषयी विचारण्यात आले. या वेळी १ टक्के पुरुषांनी एकापेक्षा अधिक महिलांशी शारीरिक संबंध असल्याचे सांगितले. १ टक्क्यापेक्षा अल्प महिला आणि ४ टक्के पुरुष यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पती-पत्नी किंवा जोडीदार यांच्या व्यतिरिक्त अन्यांशी शारीरिक संबंध ठेवले.
२. एक मासापेक्षा अधिक काळ घराबाहेर राहिल्यानंतरही इतर लोकांशी शारीरिक संबंध निर्माण होण्याची शक्यता वाढते, असे या सर्वेक्षणातून लक्षात आले. त्यातही यामध्ये सुशिक्षित आणि श्रीमंत असणार्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण अधिक दिसून आले.
३. महिला आणि पुरुष सरासरी ७ दिवसांच्या अंतराने शारीरिक संबंध ठेवतात, तर वयानुसार महिलांशी संबंध ठेवण्याच्या अंतरामध्ये वाढ होते. ज्या पुरुष आणि महिला यांचा विवाहाला बराच काळ लोटला आहे, अशा व्यक्ती अविवाहित लोकांपेक्षा अल्प प्रमाणात शारीरिक संबंध ठेवतात.
४. जर महिला १ मासापेक्षा अधिक काळ बाहेर रहात असतील, तर त्यांच्या शारीरिक संबंध ठेवणार्या जोडीदारांची संख्या सरासरी २.३ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.
संपादकीय भूमिका
|