जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाला चालना देऊ ! – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी 

सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वीकारला पदभार !

(डावीकडे) कुमार आशीर्वाद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना मिलिंद शंभरकर 

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २२ जुलै या दिवशी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी कुमार आशीर्वाद म्हणाले की, माझा सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास आहे. येथील समस्याही ठाऊक आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास करण्यावर भर देऊ. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात तीर्थक्षेत्रे मोठ्या प्रमाणात असून तीर्थक्षेत्र विकासाला चालना देऊ. माझे वडील मोठे शिवभक्त आहेत. त्यामुळे सोलापूर येथील श्री सिद्धरामेश्वरांचे मंदिर पाहून समाधान वाटले.