उंब्रज (तालुका कराड) येथील गोरक्षक वैभव जाधव यांचा सत्कार !
कराड, २२ जुलै (वार्ता.) – ‘गोशाला महासंघ महाराष्ट्र गोरक्षा स्थली स्मारक समिती, पुसद’ (जिल्हा यवतमाळ) यांच्या वतीने गोरक्षण क्षेत्रात काम करणार्या महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळा यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये उंब्रज येथील ‘श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान’चे सदस्य तथा गोरक्षक श्री. वैभव जाधव यांचा गोरक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याविषयी श्रीक्षेत्र माहूरगड येथील शाम भारतीजी महाराज यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजप खासदार अनिल बोंडे, विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकवाड, श्री. मिलिंद एकबोटे यांसह महाराष्ट्रातील गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. वैभव जाधव हे सनातन संस्थेचे हितचिंतक असून त्यांनी आपल्या सहकार्यांच्या साहाय्याने जूनमध्ये पाटण येथून फलटण या ठिकाणी कत्तलखान्यामध्ये अवैधरित्या घेऊन जाणार्या गोवंशियांची सुटका करत वाहनचालकावर उंब्रज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली होती.