रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. ‘आश्रमातील प्रत्येक क्षण हे ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे.’ – डॉ. अजय कुमार जयस्वाल, जैतपुरा
२. ‘आश्रम पाहून मला अद्भुत शांती अनुभवता आली. आश्रमात पुष्कळ साधक आहेत; परंतु आश्रमातील वातावरण अतिशय शांत आहे. येथे आल्यावर माझे मन स्थिर आणि प्रसन्न झालेे.’ – श्री. जय प्रकाश सिंह, जिल्हा वाराणसी, उत्तरप्रदेश.
३. ‘आश्रमातून ईश्वरी शक्ती प्रक्षेपित झाली’, असे मला अनुभवता आले.’ – श्री. सुमित सेन (धर्मरक्षक), भोपाळ, मध्यप्रदेश.
४. ‘आश्रमात सगळीकडे स्वच्छता आहे. आश्रमातील वस्तूंची रचना सात्त्विक पद्धतीने केली आहे. आश्रमातील वातावरण आध्यात्मिक आहे.’ – श्री. श्रवण कुमार, शिवपूर, वाराणसी.
आश्रमातील ‘संशोधन’ आणि ‘संगीत’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय
टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.
१. ‘आपण संगीताचा अत्यंत सूक्ष्म स्तरावर अभ्यास आणि संशोधन केले आहे. ‘संगीताचे मानवी मनावर होणारे परिणाम इतरांना समजावून सांगणे’, हे फार चांगले कार्य आहे.’ – श्री. श्रवण कुमार, शिवपूर, वाराणसी.
२. संगीत आणि संशोधन याविषयी मला काहीच माहिती नव्हती. मला पहिल्यांदाच हे समजले की, संगीताचा आमच्या जीवनावर एवढा प्रभाव पडू शकतो.’ – श्री. अविनाश कुमार बादल, प्रदेश अध्यक्ष, हिंदु पुत्र संघटन, बिहार.
३. फारच उत्तम ! वैज्ञानिक संशोधनावर आधारित संगीत विद्येचा वातावरणावर आणि वातावरणाचा संगीतावर होणारा प्रभाव अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितला.’ – मेजर सरस त्रिपाठी, लेखक अन् प्रकाशक, प्रज्ञा मठ पब्लिकेशन , गाजियाबाग, उत्तरप्रदेश.
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |