आगामी निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी रहातील ! – रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या गटाने सत्तेमध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री पालटण्यात येण्याविषयी सर्वत्र चर्चा चालू झाली आहे. २२ जुलै या दिवशी याविषयी पत्रकारांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले काम करत असून तेच आगामी निवडणुकीपर्यंत कायम मुख्यमंत्रीपदी रहातील, तसेच आम्ही कुणाचाही पक्ष फोडला नाही. ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आवडले आहे, ते पक्षात येत आहेत, असे सांगून आरोपाचे खंडण केले.